Tuesday , February 7 2023

कर्जतमध्ये कीर्तन महोत्सवाची सांगता

कर्जत : प्रतिनिधी

श्री ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळा समितीच्या वतीने कर्जतमधील माऊली मैदानावर यंदा 42व्या वर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी ह.भ.प. मारुती महाराज राणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सात दिवस चाललेल्या या महोत्सवाची सांगता झाली. त्यानंतर शौर्य शिवाजी भासे या कृष्ण वेषधारी चिमुरड्याच्या हस्ते हंडी फोडण्यात आली.

सांगता सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दिंडी काढण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या दीपोत्सव सोहळ्याला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे, ह.भ. प. मारुती महाराज राणे, नथुराम हरपुडे, मोरेश्वर महाराज पेमारे, श्रीराम पुरोहित आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर तिवाटणे यांनी केले. रात्री संत एकनाथ महाराज यांचे 14वे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावींचे जागर कीर्तन झाले. त्यांनी हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा… या तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तनसेवा केली. त्यांना मृदुंगावर मनोहर कडू आणि अनिल फराट यांनी साथ संगत केली. त्यांचा सत्कार रामभाऊ वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शिवाजीराव देशमुख, ज्ञानेश्वर तिवाटणे, संतोष वैद्य, दत्तात्रेय म्हसे, साजन ओसवाल, दौलत देशमुख, वसंत सुर्वे, शिवाजी भासे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply