Breaking News

निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धनच्या प्रभू विश्वकर्मा मंदिराचे नुकसान

श्रीवर्धन : प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते येथील प्रभू विश्वकर्मा मंदिराचे फार मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रत सुप्रसिद्ध असलेल्या विश्वकर्मिय कारागिरांचे व सर्व स्तरातील कारागीर वर्गाचे श्रद्धास्थान असलेले विश्वकर्मिय लोहार सुतार समाज ता. श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड या रायगड विभागीय संघटनेचे प्रभु विश्वकर्मा मंदिर भोस्ते, ता. श्रीवर्धन, जि. रायगड येथे आहे. 3 जून रोजी झालेल्या निसर्ग  चक्रीवादळात या मंदिराचे 85 ते 90 टक्के नुकसान झालेले आहे. दोन सभागृह एक सभामंडप यावरील बहुतांशी छतांच नुकसान झाले असून भोवतालचे वॉल कंपाऊंड जमीनदोस्त झाले आहे. मंदिराच्या दुरुस्तीकरता व नूतनीकणासाठी सर्व स्तरावरील व विशेषत: विश्वकर्मि वंशाचे सर्व कारागीर वर्गाने  तसेच दानशूर मंडळींनी सढळ हस्ते आर्थिक मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन  मंदिराच्या ट्रस्टने केले आहे.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply