
माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पन्हळघर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. माणगाव पंचायत समितीचे सभापती राजेश पणावकर यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पन्हळघर येथील कार्यकर्ते दीपक करकरे, अनिल चेरफळे, काशिराम सावंत, संदीप मनवे, धोंडू वाढकर आदींनी त्यांच्या अनेक समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. लोणेरे विभाग शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख पंढरी शेडगे, शाखाप्रमुख बयाजी करकरे, रामचंद्र झोरे, दिलीप टेंबे, दिलीप करकरे, रोहित करकरे यांच्यासह शिवसैनिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.