Breaking News

ग्रामीण भागात पिठोरी उत्साहात साजरी

उरण : प्रतिनिधी

श्रावण सुरू होताच ग्रामीण भागातील कष्टकरी जनता आपले सण साजरे करण्यास प्राधान्य देत आहे. यामध्ये पिठोरी आमवस्येला पिठोरीची पूजा गावागावातील अनेक घरात केली जाते. पिठोरी पूजन हे व्रत असल्याने हे दरवर्षी नित्यनियमाने करण्यास प्राधान्य दिले जाते.

श्रावणातील नागपंचमी, मंगळागौरी, यांच्या प्रमाणेच श्रावण आमवस्येला पिठोरी आमावस्या म्हणून त्या दिवशी पिठोरीची पूजा केली जाते. घरावरील संकटे दूर होऊन आपल्या परिवाराला सुख समृद्धि लाभावी म्हणून देवीची भक्ती भावनेने पूजा केली जाते. लव्हाले, तेरड्याची झाडे, नागवेल यांची पत्री आणून श्रावण आमवस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरातील पाटावर त्याची आरास करून देविची भक्ती भावाने मनोभावे पूजा केली जाते.

या वेळी आप्त स्वकीयाना पूजन सोहळ्यासाठी आग्रहाचे निमंत्रण दिले जाते. पुजनानंतर महाप्रसाद करून मध्यरात्री पर्यंत पिठोरी देवीचा जागर केला जातो. आणि मध्यरात्री नंतर पूजन केलेल्या पत्रीचे शेतकरी आपल्या शेतामध्ये किंवा तलावात विसर्जन केले जाते. ग्रामीण भागातील ही पूर्वांपर चालत आलेली प्रथा ही आजतागायत मोठ्या उत्साहात व भक्ती भावनेने पाळली जाते.उरणच्या पूर्व भागात पिठोरी आमावस्या सोहळा मोठ्या उत्साहात सम्पन्न होत असल्याने काल जनतेच्या उत्साहात उधाण आले होते.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply