Breaking News

देशभक्तीपर गीतांची ऑनलाइन स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर एकल गीत स्पर्धेचे आयोजन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा ऑनलाइन स्वरुपात झाली. त्याला पनवेल परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेमध्ये श्रीरंग केतकर याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. पद्मजा कुलकर्णी व केतकी ओक यांनी द्वितीय आणि आशा जांबेकर यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. वैशाली केतकर, वर्षा खेडकर व निधी जांबेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सुदर्शन जोशी याला स्वरचित उत्कृष्ट पोवाडागायनासाठी विशेष पारितोषिक देण्यात आले.

ज्येष्ठ शास्त्रीय संगीत अभ्यासक मिलिंद गोखले, गायक व संगीतकार मंदार भिडे आणि शास्त्रीय गायिका मधुरा सोहोनी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सूर, ताल, भाव, उच्चारण आणि सादरीकरण अशा निकषांवर स्पर्धा संपन्न झाली. मिलिंद गांगल यांनी स्पर्धेचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन केले. गुगल मीटवर संपन्न झालेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष गिरीश समुद्र, कमांडर दीपक जांबेकर यांच्यासह पदाधिकार्‍यानी अथक परिश्रम घेतले.

भारत विकास परिषद ही आपल्या राष्ट्राच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कटिबद्ध असलेली संस्था आहे. या परिषदेच्या वतीने नेहमीच समाजोपयोगी कार्य केले जाते. देशातील तरुणांमध्ये देशभक्तीची मूल्ये रुजविण्यासाठी देशभक्तीपर एकल गीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

– गिरीश समुद्र, अध्यक्ष, भा.वि.प.,पनवेल शाखा

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply