Breaking News

लाच स्वीकारताना दोघे ताब्यात

पनवेल : दिड लाखाची लाच मागून त्यातील 50 हजारांचा पहिला हफ्ता स्वीकारणार्‍या कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगरसह एका खाजगी व्यक्तीला बुधवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

यातील तक्रारदार यांच्याविरूद्ध पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर (30) यांच्याकडे फसवणुकीचा तक्रारी अर्ज चौकशीसाठी आला होता. त्या अर्जावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी वरील लोकसेवकाने तक्रारदाराकडे प्रथम 10 लाखांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडी अंती दिड लाखांवर त्यांचा व्यवहार ठरला त्यातील 50 हजारांची लाच आज स्विकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सापळा रचून सदर अधिकार्‍यासह खाजगी व्यक्ती नितीन जोशी (28, रा. कामोठे) यांना रंगेहाथ पकडले. भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे यांच्याशी ला.प्र.वि. ठाणे मध्यवर्ती कारागृहासमोर, ठाणे किंवा रलल ारहरीरीहीींर ारहरिेश्रळलश.र्सेीं.ळप आणि टोलफ्री नं.-1064, दुरध्वनी-02220813598 /20813599, व्हॉट्सअ‍ॅप-9930997700 येथे संपर्क साधावा.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply