Breaking News

पनवेल परिसरात कृत्रिम तलावांची होणार निर्मिती

पनवेल : बातमीदार

गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पनवेल महापालिकेने 41 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. हे तलाव 4 बाय 6 फूट लांबी-रुंद आणि चार फूट खोल असतील. नागरिकांनी थेट पाण्यात जाऊन विसर्जन करू नये, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात  येत आहे.

तसेच या संदर्भात भाजप चे स्थानिक नगरसेवक तथा प्रभाग समिती व सभापती संजय भोपी गेल्या दोन वर्षापासून खांदा वसाहतीत गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची मागणी केली होती. प्रभागामध्ये  कृत्रिम तलाव निर्माण करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत पालिकेतर्फे प्रभाग निहाय कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. पनवेल परिसरात दीड, पाच दिवस, सात दिवसांचे तसेच अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. कोरोनामुळे यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे नैसर्गिक तलावांऐवजी कृत्रिम तलावात विसर्जन करण्यावर पालिकेचा भर असणार आहे. 41 कृत्रिम तलावासाठी एकूण 100 लोखंडी टाक्या बनविण्यात आलेल्या आहेत.

प्रभाग निहाय कृत्रिम तलावांची संख्या

 प्रभाग अ               – 26

 प्रभाग ब                – 7

 प्रभाग क               – 2

 प्रभाग ड                – 6

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply