Breaking News

पनवेल तालुक्यात 232 नवे कोरोनाग्रस्त

एकाचा मृत्यू; 220 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 21) कोरोनाचे 232 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा  मृत्यू  झाला आहे तर 220 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 165 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 160 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 67 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 60 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे सेक्टर 7 येथील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 13, कामोठेमध्ये 50, खारघरमध्ये 21, नवीन पनवेलमध्ये 50, पनवेलमध्ये 29, तळोजामध्ये दोन नवीन रुग्ण आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 9946 रुग्ण झाले असून 8266 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.11 टक्के आहे. 1429 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 251 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे 13, सुकापूर 13, पळस्पे सहा, डेरवली पाच, विचुंबे चार, आदई तीन, देवद, केवाळे, कोन, नितळस, करंजाडे येथे प्रत्येकी दोन, कोळखे, कुंडेवहाळ, न्हावा, शिवकर, बेलवली, चिंचवण, गव्हाण, नांदगाव, नेवाळी, पारगाव, उमरोली, वहाळ, वारदोली येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल ग्रामीणमध्ये पॉझिटिव्हची संख्या 3018 झाली असून 2531 जणांनी कोरोनावर मात केली असून 60 जणांचा मृत्यू झाला आहे.

कर्जतमध्ये 16 नवे पॉझिटिव्ह

कर्जत : तालुक्यात शुक्रवारी वनाधिकार्‍यासह 16 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे एकूण संख्या 738 झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 36 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये आमराईमधील हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेच्या नजीक दोन, विठ्ठल नगर दोन, नेरळमधील जुन्या बाजारपेठेत तीन, नेरळ राजेंद्र गुरूनगर, वेणगाव श्रद्धा फाउंडेशन संस्था, दहिवली, टाटा पॉवर कॅम्प, दहिवली बुद्धनगर, भिसेगाव, नेरळ नजीकच्या बोपेले, नेरळ नजीकच्या बेकरे, आदिवासी भागात असलेल्या नांदगाव येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

रोह्यात 19 नवीन कोरोनाबाधित

रोहा : तालुक्यात शुक्रवारी 19 नवे कोरोनाबाधित आढळल्याने एकूण 1039 रुग्ण झाले आहेत. तर 10 व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने कोरोनावर मात करणार्‍यांची एकूण संख्या 827 एवढी झाली आहे. शुक्रवारी आढळलेल्या व्यक्तींमध्ये  रोहा शहरात 13 व ग्रामीण भागात सहा व्यक्ती कोरोना बाधित सापडले आहेत. यामध्ये आठ पुरुष व 11 महिलांचा समावेश आहे. तर 60 वर्षावरील तीन व्यक्ती कोरोनाबाधित आहेत.

उरणमध्ये नऊ जणांना लागण

उरण : तालुक्यात शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह नऊ रुग्ण आढळले आहे. यामध्ये चिरले गाव, 348 आवरे शंकर मंदिर जवळ, घर नं. 649 वैभव लक्ष्मी अपार्टमेंट, केगाव घर नं. 392, करळ घर नं. 230 महेश्वर मंदिर, सीआयएसएफ सेक्टर 3 जेएनपीटी, घर नं. 511 बौधवाडा येथे प्रत्येकी एक व भेंडखळ येथे दोघांचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1220 झाली आहे. त्यातील 980 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 183 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 57 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत 332 कोरोना रुग्णांची नोंद

नवी मुंबई : नवी मुंबईत शुक्रवारी 332 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बधितांची एकूण संख्या 22 हजार 607 तर 350 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची 18 हजार 654 झाली आहे व सहा जणांचा मृत्यू झाला आहे.  आढळलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 43, नेरूळ 74,  वाशी 48, तुर्भे 27, कोपरखैरणे 44, घणसोली 44, ऐरोली 48, दिघा चार इतकी आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply