Breaking News

सेवा सप्ताह उपक्रम

खारघरमध्ये प्लास्टिकमुक्ती व स्वच्छता अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त सेवासप्ताह अंतर्गत प्लास्टिकमुक्ती व स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती व नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्या पुढाकाराने व जिल्हा सहप्रमुख गीता चौधरी व खारघर तळोजा मंडल उपाध्यक्ष बिना गोगरी यांच्या सहकार्याने कार्यक्रमाच्या संयोजिका खारघर तळोजा मंडल महिला मोर्चा उपाध्यक्ष प्रतीक्षा कदम व सहसंयोजक राजेंद्र प्रभू यांनी सेक्टर 11 भाजी मार्केटमध्ये प्लास्टिकमुक्ती अभियान व स्वच्छता मोहीम उपक्रम राबविला.

या मोहिमेंतर्गत लोकांना प्लास्टिकबंदीचे महत्त्व पटवून देण्यात आले व कापडी पिशव्या वाटप करून लोकांना घराबाहेर निघताना कापडी पिशवी घेऊनच निघण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी सभापती व नगरसेवक अभिमन्यू पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, खारघर तळोजा मंडल शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जिल्हा सहप्रमुख गीता चौधरी, उपाध्यक्ष खारघर तळोजा मंडल बिना गोगरी, खारघर तळोजा मंडल महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, सहसंयोजिका  सोशल मीडिया उत्तर रायगड जिल्हा भाजप मोना अडवणी, आशा शेडगे, अश्विनी भुवड, काशिनाथ घरत, सुर्वे काका आदी उपस्थित होते.

उरणमध्ये फळवाटप, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान

उरण : वार्ताहर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताह कार्यक्रम अंतर्गत उरण तालुक्यात ठिकठिकाणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब नागरिकांना, नगर परिषदेचे कर्मचारी यांना फळवाटप, श्रीमती भागूबाई ठाकूर विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण तसेच गावात स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आले होते.

या कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजपचे उरण शहराध्यक्ष कौशिक शहा, भाजपचे तालुका उपाध्यक्ष पंडित घरत, भाजप महालण विभाग अध्यक्ष तथा माजी सरपंच महेश कडू, तालुका चिटणीस प्रकाश ठाकूर, तालूका सरचिटणीस सुनील पाटील, नगरसेवक राजेश ठाकूर, नंदूकुमार कडू, शशिकांत पाटील, शेखर पाटील, ग्रामपंचायत सदस्य जितेश कडू,माजी सरपंच

पूनम योगेश पाटील सह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सेवासप्ताह कार्यक्रमांतर्गत ठिकठिकाणी राबवित येत असलेल्या समाजाभिमुख उपक्रमांबद्दल आमदार महेश बालदी यांनी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply