पेण : प्रतिनिधी
पुण्यातील प्रसिद्ध कुदळे ग्रुप व सोनवणे ग्रुप यांच्या खेड व मावळनंतर आता पेण तालुक्यातील वडखळ येथे नव्या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. या दालनाचे उदघाट्न उद्योजक जितेंद्र माळी व महिंद्रा स्वराज कंपनीचे विभागीय व्यवस्थापक मंगेश डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. वडखळ-पेण तसेच रायगडच्या ग्राहकांना हवे ते सर्व ट्रॅक्टर उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन डहाके यांनी या वेळी दिले. स्वराज ट्रॅक्टर हा 1970 पासून शेतकर्यांचा मित्र असून, आतापर्यंत 18 लाख शेतकरी परिवारांचा तो सदस्य बनला आहे. गुणवत्ता, मजबूती, मायलेज, लो मेंटेनन्स, पॉवर स्टिअरिंग, फोर व्हील ड्राइव्ह, रिव्हर्स पीटीओ, 15 हॉ.पॉ. पासून ते 65 हॉ.पॉ. पर्यंत अशा नवनवीन वैशिष्ट्यांसह स्वराज ट्रॅक्टर रायगडकरांच्या सेवेत रुजू झाला असून, वडखळ शो रूममध्ये दोन महिन्यात 21 ट्रॅक्टर विक्री झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.