Breaking News

जेएनपीटीच्या कंटेनर कार्गोमध्ये 9.04 टक्क्यांची वाढ

उरण : वार्ताहर

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) भारताचे अग्रणी कंटेनर पोर्ट आहे. जेएनपीटीने नोहेंबर महिन्यात 413,737 (टीईयू) कार्गोची हाताळणी केली असून गेल्या वर्षी याच महिन्यात केलेल्या कार्गो हाताळणीच्या तुलनेत 7.61 टक्क्यांची वाढ झाली आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्याने देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने ही वाढ झाली आहे. जेएनपीटीमध्ये नोव्हेंबर महिन्यात कंटेनर सहित एकूण 5.70 दशलक्ष टन वाहतुकीची हाताळणी केली गेली जी मागील वर्षी याच महिन्यात हाताळणी केलेल्या 5.22 दशलक्ष टनांपेक्षा 9.04 अधिक आहे. नोव्हेंबर महिन्यात हाताळणी केलेल्या एकूण वाहतुकीमध्ये 0.59 दशलक्ष टन बल्क कार्गोचा समावेश आहे, मागील वर्षी याच महिन्यात 0.55 दशलक्ष टन बल्क कार्गोची हाताळणी केली गेली होती. नोहेंबर महिन्यात रेल्वे गाड्यांच्या सरासरी मासिक टर्मिनल हाताळणी वेळेमध्ये सुधारणा होऊन ती आता 4.28 तास झाली आहे, ऑक्टोबर व सप्टेंबर महिन्यात ही वेळअनुक्रमे 4.48 व 6.18 तास इतकी होती. रेल्वे गाड्यांच्या फेर्‍यांची सरासरी मासिक वेळ (ट्रेनच्या आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत) कमी होऊन नोहेंबर महिन्यात 9.08 तास झाली आहे. ऑक्टोबर व सप्टेंबर महिन्यात ही वेळअनुक्रमे 9.45 व 13.34 तास होती. जेएनपीटीमध्ये नव्याने सुरू झालेल्या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझामध्ये नोहेंबरमहिन्यात 43,619ट्रॅक्टर ट्रेलर हाताळलेगेले ज्याद्वारे 68,909 टीईयू कार्गोची वाहतुक झाली. जेएनपीटीच्या कामगिरीविषयी बोलताना देताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले जेएनपीटी देशाच्या आर्थिक प्रगतीस यापुढेही पाठिंबा देतच राहील तसेच देशातील बंदर क्षेत्राची वाढ कायम ठेवण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडत राहील. नोहेंबर महिन्यात मालवाहतूकी मध्ये झालेली वाढ परिस्थिति सुधारली असल्याचे दर्शविते आणि सध्याच्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीतही ही वाढ अशीच कायम राहील. सेठी पुढे म्हणाले की, गेल्या काही महिन्यात अनेक उतार-चढ़ाव झालेले असूनही व्यापार विनाअडथळा व सुगमरित्या सुरू रहावा यासाठी आपल्या कार्यक्षमतेत सुधारणा व कार्गो हाताळणी क्षमतेमध्ये वाढ करत जेएनपीटी आपले काम सुरूच ठेवू शकले व आयात-निर्यात व्यापारासाठी पहिल्या पसंतीचे बंदर बनु शकले. जेएनपीटीने रस्ते रुंदीकरण प्रकल्पाच 78.63% बांधकाम काम पूर्ण केले आहे. वाढवन बंदराविषयी बोलताना श्री सेठी म्हणाले जेएनपीटी महाराष्ट्रातील डहाणू जवळ ग्रीनफिल्ड वाढवन बंदराचा पर्यावरणपूरक व शाश्वत विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे तसेच पर्यावरण मंत्रालयाने आणि संबंधित प्राधिकरणांनी निर्धारित केलेल्या कठोर निकषांचे आणि पर्यावरण नियमांचे पालन करून नवीन बंदर विकसित करण्याचा आम्ही प्रयत्न करू.

नोहेंबर महिन्यात जेएनपीटीने द्रव कार्गोसह 2.5 दशलक्ष टन कोस्टल कार्गो हाताळण्याची क्षमता असलेल्या कोस्टल धक्क्याचे बांधकाम पूर्ण करीत आपल्या भागधारकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि किनारपट्टीवरील वाहतुकीस गती देण्याचे आपले वचन पूर्ण केले. या धक्क्याच्या निर्मितीमुळे वाहतूक सुलभ होईल आणि किनारपट्टीवरील माल व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

-संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीटी

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply