नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
डॉक्टर दिनानिमित्त तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर व क्रिएटीव्ह फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 29) नेरूळ स्टेशन (पश्चिम) येथील तिकीट घराजवळ रेल्वे प्रवाशांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात नेरूळ येथील 160 नागरिकांनी सहभाग घेतला होता. यात रक्त तपासणी, वजन उंची मापन, मधुमेह तपासणी व डॉक्टरांचा मोफत सल्ला, डोळे तपासणी व इसीजी अशा तपासण्या मोफत केल्या. यावेळी 40 जणांना मधुमेहाची लागण झाल्याचे आढळले.
रक्तदाब, मधुमेह, तसेच लठ्ठपणा व मनोविकार वाढत आहेत यासाठी तीन महिन्यांतून आपला रक्तदाब, वजन, तसेच रक्तातील साखर तपासणे महत्त्वाचे आहे व याच सामाजिक जाणिवेतून तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर व क्रिएटीव्ह फाऊंडेशनच्या सहयोगाने रेल्वे प्रवाशांसाठी हा महत्त्वाचा उपक्रम राबविला होता.