मोहोपाडा ः प्रतिनिधी
कोरोनाचे भीषण संकट ओढावले आहे आणि त्यातच वातावरणातील बदलामुळे नागरिकांना छोट्या छोट्या आजारांसाठीदेखील दवाखान्यात जावे लागते. यामुळे कोरोना काळात गरजू, गोरगरीबांना काही अंश दिलासा मिळावा यासाठी कानसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक चौक वावर्ले येथील दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह, अर्सेनिक अल्बम टॅबलेट, मास्क व सॅनिटायझरचेवाटप सुरू आहे.
कोरोना संकटाचे गांभीर्य ओळखून फाऊंडेशनचे संस्थापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखालील अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी विरळे पळसवडे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावात अर्सेनिक अल्बम रोगप्रतिकारक शक्ती टबलेट बोटल, तसेच विरळे बौद्धवाडीमध्ये सॅनिटायझर व मास्क वाटप केले.
या वेळी यूवा अध्यक्ष महेंद्र पाटील, दिपकृष्ण नागरी पतसंस्था मॅनेजर तानाजी पाटील, नवी मुंबई यूवा अध्यक्ष अमोल आसूलकर, अनिल पाटील, पांडूरंग पाटील, गणपत केरू पाटील, इंजिनिअर संदीप पाटील, सूरज सावंत, तूकाराम पाटील आदी उपस्थित होते.