Friday , September 29 2023
Breaking News

पेंधर गावात ‘देव घरा आयला’ नाट्यप्रयोगास रसिकांचा उदंड प्रतिसाद

चिरनेर : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील पेंधर येथे श्री विठ्ठल- रखुमाई उत्सव सोहळ्यानिमित्त नवी मुंबईतील नाट्य कलाकारांच्या अभिनयाने सजलेला आणि जयभवानी थिएटर्स प्रस्तुत, देव घरा आयला या आगरी-कोळी बोली भाषेतील नाट्यप्रयोग सादर झाला. त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

पनवेल तालुक्यातील पेंधर गावामध्ये नवी मुंबईतील नाट्य कलाकरांनी जय भवानी थिएटर्सच्या बॅनरखाली यानित्तिाने एक उत्तम कलाकृती सादर केली. या प्रयोगात सामाजिक, अनिष्ट रूढी, परंपरा व अंधश्रद्धांना वाचा फोडून रसिकांना खिळवून ठेवण्यात यश आले. या नाटकाचे लेखन धनेश्वर म्हात्रे यांनी केले आहे. कलावंतांनीसुद्धा जोरकस अभिनयाने विविध प्रसंगांत जिवंतपणा राखला. यात स्वत: धनेश्वर म्हात्रे यांच्यासह वैशाली पाटेकर, ज्योती म्हात्रे, हसुराम पाटील, मोरेश्वर पाटील, राजेंद्र जुवेकर, चेतन पाटील, सचिन मोकल, निशांत खैरे या कलाकरांनी आपली अभिनय क्षमता सिद्ध केली. पत्रकार दत्तात्रेय म्हात्रे यांच्या निवेदनाने चांगली पकड घेतली. नाटकाचे दिग्दर्शन राजेंद्र जुवेकर यांचे होते; तर नेपथ्य व प्रकाश योजना राजा जोशी, रंगभूषा सदानंद पाटील, ध्वनी संकलन हरेश पाटील, सूत्रधार नाना मोरे व गोपाळशेठ खैरे, पार्श्वसंगीत-दादा परसनाईक, संगीत विद्याधर ठाकूर, संयोजक गजानन म्हात्रे, अरुण पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, एन. के. ठाकूर, अशोक म्हात्रे आहेत. या नाट्यप्रयोगाला पेंधर पंचक्रोशीतील रसिकांची उपस्थित होती.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply