Breaking News

पहिला दिवस ‘साहेबां’चा!

कर्णधार रूटचे दमदार शतक; इंग्लंड पहिल्या दिवसाखेर 3 बाद 363 धावा

चेन्नई : वृत्तसंस्था

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडच्या संघाने 3 बाद 263 धावांपर्यंत मजल मारत खेळावर वर्चस्व राखले. पहिल्या सत्रात दोन गडी गमावल्यानंतर संपूर्ण दिवस सलामीवीर डॉम सिबली-जो रूट जोडीने खेळून काढला आणि संघाला भक्कम स्थितीत आणले. कर्णधार रूटने नाबाद शतक (128) ठोकले, पण सिबली शेवटच्या सत्रात 87 धावांवर पायचीत झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन बळी टिपले, तर अश्विनने एक गडी बाद केला.

जवळपास वर्षभराने भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीला शुक्रवारी (दि. 5) सुरुवात झाली. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रॉरी बर्न्स आणि डॉम सिबली यांनी अत्यंत संथ सुरुवात केली. काही वेळाने अश्विनच्या गोलंदाजीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करताना रॉरी बर्न्स झेलबाद झाला. त्याने 60 चेंडूंत 33 धावा केल्या.

यानंतर नवखा डॅन लॉरेन्स धावांचे खातेही उघडू शकला नाही. पाचव्या चेंडूवर त्याला बुमराहने पायचीत केले, पण त्यानंतर पहिले सत्र आणि दुसरे संपूर्ण सत्र सिबली-रूट जोडीने खेळून काढले. रूटने दमदार शतक झळकाविले, तर सिबलीने आपली लय कायम राखत त्याला साथ दिली. रूट-सिबलीने 200 धावांची भागीदारी केली, परंतु दिवसाचा खेळ संपण्यासाठी काहीच चेंडू शिल्लक असताना सिबली 12 चौकारांसह 87 धावांवर पायचीत झाला आणि खेळ थांबविण्यात आला. रूट 14 चौकार आणि एक षटकारासह 128 धावांवर खेळत आहे.

कुलदीपला वगळले; नदीमला संधी

इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीसह इशांत शर्माचे संघात पुनरागमन झाले आहे. विषेश म्हणजे मागील दोन वर्षांपासून संघात पुनरागमन करण्यासाठी वाट पाहणार्‍या कुलदीप यादला पुन्हा एकदा वगळण्यात आले आहे. कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी दीड तास आधी संघात कुलदीपला वगळण्यात आले. कोहलीने वॉशिंगटन सुंदर, आर. अश्विन आणि शाबाज नदीम या तीन फिरकीपटूंना संघात स्थान दिले आहे, तर जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांच्या खांद्यावर फिरकीची धुरा सोपवण्यात आली आहे. गाबाच्या मैदानावर ऐतिहासिक कामगिरी करणार्‍या मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनाही डच्चू देण्यात आला आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply