Breaking News

कबड्डी स्पर्धेत देऊळवाडी संघ विजेता

कर्जत : बातमीदार

मानिवलीचे सरपंच स्व. प्रवीण पाटील यांच्या नावाने आयोजित कबड्डी स्पर्धेत कर्जत तालुक्यातील देऊळवाडी संघाने बाजी मारली. कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने  जय भवानी कबड्डी संघ, जय मल्हार कबड्डी संघ अवसरे आणि मानिवली येथील जय भवानी कबड्डी संघाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील 16 नामांकित संघांनी स्पर्धेत सहभाग होता. अवसरे येथील मैदानावर स्पर्धा खेळली गेली. या स्पर्धेत जय हनुमान देऊळवाडी संघाने कर्जत मुद्रे येथील नवकुमार संघाचा पराभव करून स्व. प्रवीण पाटील स्मृती कबड्डी स्पर्धा जिंकली. तिसरा क्रमांक उंबरवाडी संघाने, तर चौथ्या क्रमांक पोसरी संघाने प्राप्त केला. विजेत्या संघाना चषक व रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी देऊळवाडी संघाचा सुयोग गायकर याची, उत्कृष्ट पकडीसाठी उंबरवाडी संघाचा विशाल गिरा, तर उत्कृष्ट चढाईसाठी नवकुमार मुद्रे संघाचा गौरव लोट याची निवड करून तिघांनाही गौरविण्यात आले.

Check Also

यंदाचा नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात होणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमागील वर्षी नमो चषक क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्याचप्रमाणे …

Leave a Reply