Breaking News

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधांसाठी सहकार्य करणार; आमदार महेश बालदी यांचे आश्वासन

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य अधिकारी डॉ. राजाराम भोसले यांनी आमदार महेश बालदी यांची आरोग्य केंद्रास भेडसावणार्‍या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी भेट घेतली. तसेच आरोग्य केंद्रासाठी विविध साहित्यांची मागणीही केली. त्या प्रकारचे पत्रही दिले. आमदार महेश बालदी यांनी त्यांच्या निधीतून आवश्यक साहित्य देण्यासाठी मदत करणार, असे अभिवचन या वेळी त्यांना दिले. डॉ. राजाराम भोसले यांनी दिलेल्या पत्रात विविध साहित्यांची मागणी केली आहे. त्यात सोलर लाइट, वॉटर हिटर, विद्युत जनरेटर, पाण्याची टाकी आदी साहित्यांची मागणी करण्यात आली. उरण पूर्व विभागासाठी प्राथमिक केंद्रास लवकरच रुग्णवाहिका आमदार निधीतून देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या मागणीचा विचार करून आपल्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर या वस्तूंची पूर्तता करणार आहोत. सकारात्मक चर्चा होऊन योग्य निर्णय घेऊन पूर्व विभागाला भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे आमदार महेश बालदी यांनी या वेळी सांगितले. निवेदन देताना आरोग्य अधिकारी डॉ. राजाराम भोसले, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, अल्पसंख्याक उत्तर रायगड अध्यक्ष जसिम गॅस, चिरनेर पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर, प्रीतम म्हात्रे, कल्पेश म्हात्रे, सचिन गावंड आदी उपस्थित होते. आमदार महेश बालदी यांनी दिलेल्या आश्वासनामुळे कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य अधिकारी डॉ. राजाराम भोसले यांनी आमदार बालदी यांचे आभार व्यक्त केले.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply