पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या वतीने बूथ संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 19, बूथ नंबर 471ची बैठक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 28) संपन्न झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
पनवेल येथील प्रभाग क्रमांक 19, बूथ नंबर 471च्या बूथ संपर्क अभियानाच्या बैठकीवेळी भाजपचे शहर सरचिटणीस अमरिश मोकल, बूथ अध्यक्ष संदीप पाटील, राजेश गिरडा, महेंद्र शेटे, बैजू शहा तसेच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper