Breaking News

ओएलएक्सवरील खरेदीच्या बहाण्याने फसवणूक; 98 हजारांना गंडा

पनवेल ः वार्ताहर

ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवलेले फर्निचर खरेदी करण्याच्या बहाण्याने एका इसमाने संबंधित मालकाचा क्युआर कोड मिळवून त्यातून त्याच्या खात्यातील 98 हजार 456 रुपये वळते करून त्याची फसवणूक केल्याची घटना खारघरमध्ये घडली आहे.

खारघर वसाहतीत राहणारे सुरेश यादव यांनी ओएलएक्सवर विक्रीसाठी फर्निचरची माहिती आणि फोटो पोस्ट केले होते. हे फर्निचर खरेदी करावयाचे आहे, असे सांगून किशोर कुमार या व्यक्तीने त्यांच्या खात्यावर एक हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांना क्युआर कोड स्कॅन करा, असे सांगितले. हा कोड स्कॅन केल्यावर सुरेश यांच्या खात्यातून जवळपास 98 हजार 456 रुपये वळते करून घेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.

संशयास्पदरीत्या घुटमळणार्‍या व्यक्तीविरोधात कारवाई

पनवेल ः वार्ताहर

कोणता तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या घुटमळणार्‍या व्यक्तीविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.

अमानत मुसीबत अली (35, रा. शिवपूर, उत्तर प्रदेश) हा इंडिया बुल्स ग्रीन सोसायटीच्या भिंतीलगत कोन गाव, ता. पनवेल या ठिकाणी कोणत्या तरी अज्ञात इराद्याने घुटमळत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार व पोलीस शिपाई मनोहर इंगळे यांनी या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 (ख)प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply