Breaking News

लेफ्टनंट ऑफिसर ऋचा दरेकरवर अभिनंदनाचा वर्षाव

रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा

कर्जत : प्रतिनिधी
रायगडची कन्या ऋचा कृष्णकांत दरेकर हिची भारतीय लष्करात लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे. याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ऋचाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याची भावना व्यक्त होत आहे.
मूळची पळसदरी येथील रहिवासी असलेली ऋचा हिचे आठवीपर्यंतचे शिक्षण खोपोली येथील शिशुमंदिरमध्ये झाले, तर आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण तिने पनवेल येथील बार्न्स हायस्कूलमध्ये घेतले. मग रसायनी येथील पिल्लई कॉलेजमधून ऋचाने इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन या शाखेतून इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली. त्याचप्रमाणे घाटकोपर येथील आर. जे. झुनझुनवाला कॉलेजमध्ये एम्टेकची पदवी घेतली. त्यानंतर तिने टीडीएसचीही परीक्षा दिली. या परीक्षेतून तिची निवड झाली आणि बंगळुरूरला सव्हिसेस सिलेक्शन बोर्ड परीक्षेत यश मिळविल्यावर चेन्नई येथे ऑफिसर अकॅडमीत ट्रेनिंग सुरू झाले. या कॅडेटची पासिंग आऊट परेड होऊन भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट ऑफिसर या पदावर ऋचाची नियुक्ती झाली.
ऋचाचे वडील व्यावसायिक आहेत, तर आई वकिली करते. दोन वर्षे लॉकडाऊन काळात घरी असताना काहीतरी आव्हानात्मक कामगिरी करावी आणि त्यातच पुढे उराशी बाळगून ऋचाने भारतीय सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला आणि हे स्वप्न पूर्ण करून दाखविले आहे. ऋचाने अत्यंत वेगळे क्षेत्र निवडले आणि कठोर प्रयत्नांतून हे यश संपादन केले आहे. यासाठी तिने कोणताही क्लास किंवा ट्रेनिंग घेतले नव्हते. याबद्दलची आवड तिला तिच्या भावाकडून मिळाली. ती एक तलवारबाज असल्यामुळे काहीतरी वेगळे करण्याकडे तिचा कल होता. भारतीय लष्करात लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्त झाल्याबद्द सर्वत्र तिचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply