Breaking News

पनवेल विधानसभा क्षेत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे विशेष प्रसारण

पनवेल : रामप्रहर वृत्त
’पनवेल : रामप्रहर वृत्त
’स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन रविवारी (दि. 7) अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेच्या वतीने पनवेलच्या ओरियन मॉल आणि खारघर येथील लिटिल वर्ल्ड सिनेमा येथे करण्यात आले होते.
या वेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांचे स्वागत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, सरचिटणीस अमित ओझे, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, सांस्कृतिक सेल जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, भाजप खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, गुरूनाथ गायकर, निलेश बाविस्कर तसेच संजय भगत, महिला जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिन्द्रे, खारघर मंडळ अध्यक्ष साधना पवार, भाजप शहर मंडळ सरचिटणीस दीपक शिंदे, अमर उपाध्याय, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, निलेश पाटील, प्रवीण बेहेरा, अक्षय लोखंडे, शैलेंद्र त्रिपाठी, वासुदेव पाटील आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार, त्यांनी केलेले कार्य हे तरुण पिढीमध्ये रुजविणे अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुषंगाने या चित्रपटाच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांपर्यंत हे विचार पोहचतील. रणदीप हुड्डा यांच्या कष्टातून ही न भुतो न भविष्यति अशी अजरामर कलाकृती या चित्रपटाच्या रूपाने जन्माला आली आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply