Breaking News

कर्जतमध्ये नवीन नऊ पॉझिटिव्ह

कर्जत : प्रतिनिधी

तालुक्यात कोरोनाचा जोर कमी-जास्त होत आहे.  गुरूवारी (दि. 11) नवीन नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर बुधवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे दोन दिवसात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात चिंताजनक वातावरण झाले आहे.

कर्जत तालुक्यात आजपर्यंत 1949 कोरोना रुग्ण सापडले असून त्यापैकी 1829 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 17 जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. गुरूवारी श्री महाशिवरात्री उत्सव साजरा झाला. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्हमध्ये वाढ होते की काय? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बुधवारी नेरळ येथील एका 60 वर्षांच्या व्यक्तीचा, आणि 21 वर्षांच्या युवकाचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर गुरुवारी कर्जत शहर, मुद्रे खुर्द, नेरळ, डिकसळ, जांभिवली गावात कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, अशी माहिती देण्यात आली.

सुधागडात रुग्णसंख्येत भर

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. गुरुवारी (दि. 11) सायंकाळी  प्राप्त अहवालानुसार तालुक्यात कोरोना बाधित एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 16 वर पोहचली आहे.

सध्या सुधागड तालुक्यात कोरोनाचे 16 सक्रिय रुग्ण असून यातील 14 रुग्ण गृहविलगीकरणमध्ये तर दोन रुग्ण रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशीकांत मढवी यांनी दिली.

रोह्यात कोरोना रुग्णांत वाढ

रोहे ः प्रतिनिधी

तालुक्यात कोरोना रूग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गुरूवारी (दि. 11) कोरोनाचे नवे पाच रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. रोहा तालुक्यात आतापर्यंत 2623 कोरोना रूग्ण सापडले असून त्यातील 2494 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहेे. तालुक्यात सध्या कोरोनाचे 37 सक्रिय रुग्ण असून ते विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply