Breaking News

कर्जतमध्ये ट्रक उलटला

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

चौक- मुरबाड रस्त्यावरील चारफाट्यानजिकच्या  रेल्वे पुलाच्या चढणीवर एक लोखंडी सळया भरलेला ट्रक पलटी झाला आणि अडकला. अन्यथा खाली राहणार्‍या घरातील रहिवाश्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता. या अपघातात ट्रकची पुढची काच फुटल्याने चालक सुरक्षितपणे बाहेर आला. ही घटना रात्री दीडच्या सुमारास घडली.

लोखंडी सळ्या भरलेला ट्रक मुरबाडहून खोपोलीकडे जात असताना कर्जत रेल्वे पुलाच्या अलीकडे असलेल्या चढणीवर एका स्कार्पिओ गाडीने हूल दिली आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चढणीवरील लोखंडी कठडा तोडून खाली पलटी झाला, मात्र तो पूर्णपणे खाली न जाता मध्येच अडकला.

या वेळी मोठा आवाज झाला व ट्रकमधील लोखंडी सळ्या खाली असलेल्या मुद्रे बुद्रुक गावामधील घरांजवळ पडल्या. ट्रक अडकल्याने घरांमध्ये राहणार्‍यां रहिवाशांच्या जीविताचा धोका टळला. या अपघातात ट्रकच्या केबिनची काच फुटली. त्यामुळे चालक रामदास कांबळे सुरक्षित बाहेर पडला.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply