Breaking News

महिलांना हीन वागणूक देणार्या हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खोपोलीत भाजपतर्फे निषेध

अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन

खोपोली : प्रतिनिधी

जागतिक महिला दिनी महिला आमदारांना वेठबिगार्‍यासारखी वागणूक देणारे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाकडून उत्तर रायगड अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी

(दि. 12) खोपोलीत आंदोलन करण्यात आले.

भाजप महिला मोर्चाच्या खोपोली शहर अध्यक्ष शोभा काटे, स्नेहल सावंत, उज्वला दिघे, अनिता शहा, भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, खोपोली शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, वामन दिघे, हेमंत नांदे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी हुड्डा यांच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच त्यांच्या कृत्याचा निषेध करण्यात आला.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply