Breaking News

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाचा हल्लाबोल

पनवेल ः रामप्रहर वृत्त
उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चातर्फे पूजा चव्हाणला न्याय मिळावा, या मागणीसाठी राज्य सरकारविरोधात कळंबोली मॅकडोनल्डजवळ शनिवारी (दि. 27) चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पूजाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पूजाला न्याय मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. संपूर्ण राज्यभरातही या प्रकरणी भाजपकडून राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.
पूजा चव्हाणच्या मृत्यूला अनेक दिवस उलटून गेले तरीही तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही. न्यायाची मागणी करणार्‍यांवर कारवाई केली जाते आणि गंभीर आरोप असणारे मात्र मोकाट फिरत आहेत. पूजा चव्हाण मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्या वतीने शनिवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याअंतर्गत भाजप उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली येथे महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप असणार्‍या मंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे तसेच पूजाच्या मृत्यूची सखोल चौकशी करून कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेविका प्रमिला पाटील, वृषाली वाघमारे, राजेश्री वावेकर, रूचिता लोंढे, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष मनीषा निकम, सुहासिनी केकाणे, माजी नगरसेविका नीता माळी, ज्योती देशमाने, संध्या शारबिद्रे, प्रियंका पवार, राखी पिंपळे, मनीषा बहिरा, स्वाती केंद्रे, खोपोली शहर अध्यक्ष शोभा कांडे, माजी नगरसेविका अनिता शहा, सुमिता महिर्षी, जयश्री धापटे, वैशाली पाटील, दुर्गा सहाणी, अश्विनी अत्रे, मनीषा पाटील, वृषाली पाटील, सरिता बसनो, आशा देवी मल्हार, पूजा पाटील, भागमुणी शहा, प्रिया मुकादम  नीता अधिकारी, लैला शेख, हर्षदा तुपे, ललिता नारायण, सोनाली सावंत, सोनाली घरटमोल, साधना आचार्य, यमुना प्रकाशन, श्रषीता देवरुखकर, वैशाली पाटील, आशा मुंढे यांच्यासह सर्व महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या आंदोलनावेळी कळंबोली येथे महामार्गावरील वाहतूक अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी तेथे धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. या वेळी कळंबोली पोलिसांनी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेविका प्रमिला पाटील, वृषाली वाघमारे, राजेश्री वावेकर, रूचिता लोंढे, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष मनीषा निकम, सुहासिनी केकाणे, माजी नगरसेविका नीता माळी, ज्योती देशमाने, संध्या शारबिद्रे, प्रियंका पवार, राखी पिंपळे, मनीषा बहिरा, स्वाती केंद्रे, खोपोली शहर अध्यक्ष शोभा काटे, माजी नगरसेविका अनिता शहा, सुमिता महिर्षी, जयश्री धापटे, वैशाली पाटील, दुर्गा सहाणी, अश्विनी अत्रे, मनीषा पाटील, वृषाली पाटील, सरिता बसनो, आशादेवी मल्हार, पूजा पाटील, भागमुणी शहा, नीता अधिकारी, लैला शेख, हर्षदा तुपे, ललिता नारायण, सोनाली सावंत, सोनाली घरटमोल, साधना आचार्य, यमुना प्रकाशन, श्रषीता देवरुखकर, आशा मुंढे, रश्मी भारद्वाज, दीपाली तिवारी, चेतना पुषवाहक, राणी राणापूर या आंदोलक महिलांना ताब्यात घेतले. मार खावा लागला तरी आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका या वेळी आंदोलकांनी घेतली होती, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply