अलिबाग : जिमाका
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड नागरी संरक्षण दलाने उरण व आसपासच्या परिसरात कोरोनाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
नागरिकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, या चतु:सूत्रीचे कटाक्षाने पालन करण्याविषयी तसेच गर्दी न करणे, ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय मदतीकरिता जाणे, 45 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करून घेणे या बाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.
नागरी संरक्षण दलाच्या रायगड उपनियंत्रक राजेश्वरी कोरी यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पाटील, ना. के. म्हात्रे यांनी शुक्रवारी (दि.9) चिरनेर बसस्थानक, उरण बाजारपेठ, उरण पंचायत समिती कार्यालय, तलाठी कार्यालय या ठिकाणी कोरोनाबाबत जनजागृती केली.