नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी यांचे सहकार्य
पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील चांदेपट्टी येथील ग्रामस्थांना आंबेघर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या आपद्ग्रस्तांना पेण तालुका आणि नागोठणे शहर भाजपतर्फे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. पेण तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या चांदेपट्टी गावाला दरड व भूस्खलनाची भीती असल्याने तेथील 26 कुटुंबांतील 56 ग्रामस्थांना पेण तालुका मराठा समाज सभागृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. या स्थलांतरित करण्यात आलेल्या चांदेपट्टीवासीयांना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या पुढाकाराने पेण तालुका आणि नागोठणे शहर भाजपतर्फे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, भाजपचे नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, उपाध्यक्ष गौतम जैन, रोहा तालुका महिला मोर्चा उपाध्यक्ष नीलिमा राजे, नागोठणे विभाग महिला मोर्चा सरचिटणीस मुग्धा गडकरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आणि तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनीदेखील गुरुवारी (दि. 7) मराठा समाज सभागृहात जाऊन चांदेपट्टी ग्रामस्थांची भेट घेतली व त्यांना पुरविण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला.
चांदेपट्टी गावाला भूस्खलनाची कायमस्वरूपी भीती आहे. या गावाच्या पुनर्वसनासाठी अनेक ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध आहेत. या गावाच्या पुनर्वसनासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्यात येईल.
-वैकुंठ पाटील, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा, भाजप