Breaking News

पाली आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी

कुपन न मिळाल्याने नागरिक संतापले

पाली : रामप्रहर वृत्त

कोविड लसीकरण करण्यासाठी शुक्रवारी (दि. 9) पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रचंड गर्दी झाली होती. मात्र सर्वांना कुपन न मिळाल्याने व नंतर येणार्‍यांना कुपन दिले गेल्याने नागरिक संतप्त झाले होते. या वेळी आरोग्य कर्मचारी व नागरिक यांच्यात वाददेखील झाला.

सध्या ज्येष्ठ नागरिक, 45 वयोगटावरील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू आहे. सुधागड तालुक्यातील पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रत्येकी 100 जणांना म्हणजे तालुक्यात रोज 200 जणांना लस दिली जात आहे. आधी आलेल्या नागरिकांना नंबरचे कुपन देऊन त्यांना लसीकरणासाठी सोडले जाते. मात्र शुक्रवारी येथे अचानक प्रचंड गर्दी झाली.

पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी लसीकरणासाठी लोकांची गर्दी झाली. या वेळी नियोजनाचा अभाव दिसून आला. लवकर आलेल्या व रांगेत उभे असलेल्या नागरिकांना कुपन मिळाले नाहीत. मात्र नंतर आलेल्या व रांगेत उभे नसलेल्यांना कुपन मिळाले, असे पालीतील सामाजिक कार्यकर्ते बशीर परबळकर यांनी सांगितले.

शासनाने व्यापारी व दुकानदारांना 10 तारखेच्या आत लसीकरण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे शुक्रवारी पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी वाढली होती.

-दिलीप रायन्नावर, तहसीलदार, पाली-सुधागड

Check Also

रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …

Leave a Reply