Breaking News

वाढता वाढता वाढे..!

देशात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशभरात कोरोनाची दुसरी लाट आल्यापासूनची सर्वोच्च आकडेवारी नोंदवली गेली आहे. देशात मंगळवारी (दि. 13) सकाळी संपलेल्या 24 तासांत एक लाख 84 हजार 372 नवे रुग्ण आढळले आहेत.
कोरोना संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. यावर केंद्र सरकार कठोर पावले उचलत आहे. लसीकरण मोहीमही वेग घेत आहे. तरीही महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांत कोरोनाचा उद्रेक झाल्याने संसर्ग पुन्हा वाढत आहे. दरदिवशी साधारण सरासरी 10 ते 12 हजार रुग्णांची नव्याने भर पडत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांची एकूण संख्या एक कोटी 38 लाख 73 हजार 825 झाली आहे. मंगळवारी दिवसभरात 1027 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत एक लाख 72 हजार 85 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
सध्या देशभरात 13 लाख 65 हजार 704 लोक कोरोनाग्रस्त आहेत. एक कोटी 23 लाख 36 हजार 36 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर 11 कोटी 11 लाख 79 हजार 578 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. दरम्यान, आतापर्यंत 26 कोटी सहा लाख 18 हजार 866 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अव्वलस्थानी
महाराष्ट्रात मंगळवारी दिवसभरात 60 हजार 212 नवे रुग्ण आढळून आले, तर 281 जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात पाच लाख 93 हजार 42 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वेगाने वाढ आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply