Breaking News

शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी पालकांसह मुलांची गर्दी

कर्जत : प्रतिनिधी
नव्या शैक्षणिक वर्षात 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत, तर काही शाळा सुरूदेखील झाल्या आहेत. म्हणूनच शाळेचा गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तके व शालेपयोगी साहित्याच्या खरेदीसाठी पालकांसह मुलांची बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे.
उन्हाळी सुटीनंतर आता मुलांना शाळेचे वेध लागले आहेत. शाळेमध्ये नवीन वर्ग, नवीन मित्र अशा स्वप्नात रंगलेल्या विद्यार्थ्यांची शालेय साहित्य घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठेत सध्या शालेय वस्तू उपलब्ध झाल्याने दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. गणवेश, दप्तर, रेनकोट, छत्री, पाणी बॉटल खरेदीत पालकांसह विद्यार्थी व्यस्त आहेत. मार्केटमध्ये नव्याने आलेल्या फॅन्सी स्कूल बॅग, रेनकोट खरेदीवर विद्यार्थ्यांचा जोर आहे.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply