Breaking News

वीकेण्ड लॉकडाऊनचे उल्लंघन दोन लाख 10 हजारांचा दंड वसूल

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2मध्ये पोलीस प्रशासनाने वीकेण्ड लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून दोन लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोन लाख 13 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासन आणि शासनातर्फे करण्यात येत आहे, मात्र नागरिक त्याला जुमानत नाहीत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील आदेशानुसार पनवेल शहर, तालुका, कामोठे, खांदेश्वर, तळोजा, कळंबोली, खारघर, उरण, न्हावा शेवा, मोरा या 10 पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार वाहन कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्याचे उल्लंघन, मॉर्निंग आणि इवनिंग ऑफ करणारे नागरिक, मास्क न लावणारे नागरिक, सामाजिक अंतर न पाळल्याबद्दल, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सामाजिक अंतर आणि इतर आरोग्यविषयक खबरदारी न घेता चालू ठेवलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून एक हजार 873 जणांवर कारवाई करण्यात आली आणि तब्बल दोन लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोनामुळे राज्य शासनाने नियमावली सांगितली आहेत. नागरिकांनी त्याचे पालन करावे. अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर पडू नये. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे. -शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 2

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply