Breaking News

समस्या सोडविण्यासाठी संपर्क करा -विक्रांत पाटील

पनवेल : वार्ताहर

माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगाने काम करीत असणारे कार्यक्षम माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील हे आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्यास नेहमीच तत्पर असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना रक्त तसेच प्लाझ्मा आवश्यक गोष्ट असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून व इतर संपर्कातून गरजवंतांना त्वरित मदत करीत आहेत. त्यासाठी त्यांनी गरजू व समस्याग्रस्त नागरिकांनी मला संपर्क करा, असे आवाहन केले आहे. प्रभागातील नागरिक असो किंवा पनवेल परिसरातील गरजवंत असो त्याने आपल्याला असलेली समस्या तत्परतेने विक्रांत पाटील व त्यांचे सहकारी कामाला लागतात. त्या व्यक्तीला आवश्यक असणारा प्लाझ्मा, रक्त, रुग्णालय, इंजेक्शन आदींची मदत करत असतात. यासाठी त्यांनी त्यांच्या पायोनिअर विभागातील जनसंपर्क कार्यालयात वेगळा विभाग उभारला आहे. त्याद्वारे ते नागरिकांना मार्गदर्शन करीत असतात. त्याचबरोबर प्रभागातील पाणी, वीज, गटारे आदी समस्यांचे निवारणसुद्धा ते करीत असल्याने त्यांच्या प्रभागातून त्यांचे कौतुक होत आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply