Breaking News

डॉ. संजय सोनावणे यांनी घेतली भाजप राष्ट्रीय प्रवक्त्यांची भेट

पनवेल ः वार्ताहर

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र महसूल पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष माधव भांडारी यांची सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय सोनावणे यांनी आपल्या सहकार्‍यांसह भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, एसआरएस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय सोनावणे यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले, तसेच अयोध्या पुस्तक नियोजित प्रकाशन आणि पनवेल महानगर पालिका निवडणुकी संदर्भात चर्चा केली. या वेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र मुस्लिम संघाचे मुख्य संयोजक अ‍ॅड. एफ. एम. ठाकूर व एसआरएस ग्रुपचे व्यवस्थापक गणेश भगत उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply