नवी दिल्ली : भारतात लसीकरणाच्या मोहिमेत आता रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचा समावेश झाला आहे. नागरिक लवकरच ही लस दिली जाणार आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून देशात ‘स्पुटनिक व्ही’चे उत्पादन सुरू होणार आहे, अशी माहिती रशियामधील भारताचे राजदूत डीबी व्यंकटेश वर्मा यांनी दिली. ते म्हणाले, मे महिन्याच्या अखेरपर्यंत भारताला स्पुटनिक व्हीच्या 30 लाख डोसचा पुरवठा करण्यात येणार आहे. जून महिन्यात वाढवून 50 लाखापर्यंत पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. देशात या वर्षी या लसीच्या 85 कोटीहून अधिक लस तयार केल्या जातील. दरम्यान, कोरोना विरोधी लसींमध्ये केवळ एक डोस घ्यावा लागणार्या स्पुटनिक-लाइट लसीसाठीही भारताने रशियाला प्रस्ताव पाठवला आहे.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …