Breaking News

कोरोनाविषयक नियमांचे पालन न केल्यास दंड

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी आयुक्तांच्या आदेशांचे पालन न केल्यास आता एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अनेक नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत असल्याने महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मंगळवारी आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांसाठी दंड करण्याचे नवीन सुधारित आदेश काढले.

सार्वजनिक स्थळी मास्क, रुमाल न वापरणे 100 रुपये, सार्वजनिक स्थळी थुंकणे (रस्ते, बाजार, रुग्णालये आणि कार्यालये) 100 रुपये, सर्व दुकानदार, फळे, भाजीविक्रेते, जीवनावश्यक वस्तूंचे विक्रेते े ग्राहक यांनी सामाजिक अंतर न राखणे (दोन ग्राहकांमध्ये तीन फूट) आणि विक्रेत्याने मार्किंग न करणे, ग्राहक आणि व्यक्ती 200 रुपये, आस्थापना, विक्रेता, मालक किंवा दुकानदार 1000 रुपये, अत्यावश्यक व आपत्कालीन कारणाशिवाय लॉकडाऊन काळात वाहतूक करणे 1000 रुपये, वाहनांमध्ये विहित केलेल्या प्रवाशांपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास करणे 1000 रुपये, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठीच्या कोणत्याही आदेशाचा भंग करणे  1000 रुपये अशा प्रकारे दंडात्मक कारवाई निश्चित करण्यात

आली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply