Breaking News

नागरिकांच्या सहकार्याने वाशी गावाचा विकास

आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रतिपादन; आरोग्य शिबिरात 800 नागरिकांचा सहभाग

नवी मुंबई : बातमीदार

वाशी गावातील नागरिकांनी सहकार्य केल्यास लवकरच वाशी गावाचा विकास करणे सोपे होईल, असे मत आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले. वाशी गाव येथे भाजप व नवी मुंबई वेल्फेयर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. या वेळी नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहून त्या समाधान व्यक्त करताना बोलत होत्या. बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून वाशी गाव नवी मुंबई येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 800 नागरिकांनी लाभ घेतला. विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई वेल्फेयर फाउंडेशन यांच्या सहकार्याने तसेच अपोलो हॉस्पिटल बेलापूर, येही आय सानपाडा क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोफत आयोजन करण्यात आले होते. महाआरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, डायबिटीस, बीएमआय, ईसीजी, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला, मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या तसेच मोफत औषधे, चवनप्राश व मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत भाजप महामंत्री व बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, प्रभाग अध्यक्ष प्रवीण भगत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गुणाबाई सुतार, अविनाश भगत, नवी मुंबई वेल्फेयर फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश पाटील बिलेश भगत, राकेश भोईर , शरद पाटील, उमेश भोईर, मोनीश सुतार, निलेश भोईर, सुधाकर पाटील, संजय भोईर तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते. या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, आज वाशी गाव येथे भाजप व नवी मुंबई वेल्फेयर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहून समाधान वाटत आहे. वाशी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गुणाबाई सुतार, अविनाश भगत, नवी मुंबई वेल्फेयर फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश पाटील, नुकतीच वाशी गावची धुरा सांभाळणारे भाजप युवा मोर्चाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रवीण भगत व त्यांचे सहकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने सदर महाआरोग्य शिबिर होत आहे. वाशी गावातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी, त्यांना मोफत औषधे उपलब्ध व्हावी, हा यामागचा उद्देश असून ज्येष्ठ नागरिकांना निवारा शेड, बसण्यासाठी बाकडे, सर्व सुविधांयुक्त प्रसाधन गृह अशा सर्व सुविधांकरिता आमदार निधी उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज मोठ्या संख्येने सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग शिबिराचा लाभ घेत आहेत, वाशी गावातील नागरिकांनी अशाच रीतीने सहकार्य केल्यास लवकरच वाशी गावाचा विकास करणे सोपे होईल, असे मत आ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

Check Also

‘दीवार’ 50 वर्ष; तोच अनुभव, तोच थरार आजही कायम!

‘दीवार’ म्हणताच अनेक गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येतात… ते माझे शालेय वय. सत्तरच्या दशकात सिंगल स्क्रीन …

Leave a Reply