रेशन दुकानदार यांनी घेतला लाभ
मुरुड : प्रतिनिधी
शासनाच्या योजना तसेच थेट जनतेशी संपर्क येणार्या यंत्रणांतील लोकांचे लसीकरण करण्यासाठी सर्व सुविधायुक्त मोबाइल व्हॅन बुधवारी (दि. 26) मुरूडमध्ये दाखल झाली असून, तहसीलदार गमन गावीत यांच्या उपस्थितीत या व्हॅनमध्ये लसीकरणाची सुरुवात करण्यात आली.
मुरूड तालुक्यातील रेशन दुकानदार, शिवभोजन केंद्र, गोदामातील हमाल, वाहन चालक, घरगुती गॅस पुरवठा करणारे वितरक व कर्मचारी, पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांच्या लसीकरणासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय व ओम गगनगिरी हॉस्पिटल – नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुधवारी ही व्हॅन मुरूड तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात दाखल झाली. या वेळी नायब तहसीलदार रवींद्र सानप, पुरवठा अधिकारी केतन भगत, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविन्द कौटुंबे, शासकिय गोदाम व्यवस्थापक सचिन राजे, तालुका रास्त धान्य दुकानदार संघटनचे अध्यक्ष गिरीष साळी, सचिन कासेकर, डॉ. प्रतापराव शेंडगे, विकासराव शेंडगे, मारुती घेरदे, प्रसाद हंकारे, परिचारीका आरती म्हात्रे आदी उपस्थित होते. तालुक्यातील रेशन दुकानदारांनी या वेळी लसीकरण करून घेतले.