Breaking News

पेण तालुक्यात बुद्ध पौर्णिमा उत्साहात

पेण : प्रतिनिधी

तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2565 वी जयंती बुधवारी (दि. 26) पेण तालुक्यातील विविध ठिकाणच्या बुध्द विहारात उत्साहात साजरी करण्यात आली.

मागील दोन वर्षांपासून संपुर्ण जग कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करीत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन केले असून निर्बंध जारी केले आहेत. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून बुधवारी सकाळी पेण तालुक्यातील अंतोरे येथील बुद्ध विहारात बुद्धवंदना, पुजा पाठ घेण्यात आला. यावेळी   मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सचेंही पालन करण्यात आले. पेण शहरातील बुद्ध विहारासह  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. हमरापूर, दुष्मी, कुरनाड, पाबळ, शिहू, बेणसे गावांमधील तर काही नागरीकांनी आपल्या घरी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी केली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply