नेवार्क : वृत्तसंस्था
भारतीय बॉक्सर विजेंदर सिंगने प्रो-बॉक्सिंगमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. वर्षभर रिंगपासून लांब राहिलेल्या विजेंदरने अमेरिकेच्या माइक स्नायडरचा पराभव करीत बॉक्सिंग करियरमधील 11वा विजय मिळविला. त्याचबरोबर प्रो-बॉक्सिंगमध्ये पराभूत न होण्याचा विक्रमही त्याने कायम राखला आहे.
विजेंदर आणि स्नायडरदरम्यान अमेरिकेच्या नेवार्क (न्यूजर्सी) येथे हा सामना रंगला. आठ राऊंडच्या मिडलवेट कॉन्टेस्टमध्ये विजेंदरने स्नायडरला नॉकआऊट केले. विजेंदरने प्रो-बॉक्सिंग करियरमध्ये आतापर्यंत 11 सामने खेळले असून, या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. त्यातील आठ सामन्यात तर त्याने नॉकआऊटद्वारे विजय मिळविला आहे.
या सामन्यानंतर त्याने सर्वांचे आभार मानत या लढतीचा व्हिडिओही त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
– गान अर्पित, प्राण अर्पित, रक्त का कण-कण समर्पित। चाहता हूँ देश की धरती, तुझे कुछ और भी दूँ।
-विजेंदर सिंग