Breaking News

बुद्धिबळ परिचय उपक्रमास प्रतिसाद

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त
क्रीडाक्षेत्रात कार्यरत असलेल्या क्रीडाराधना या समूहाच्या वतीने नुकतेच बुद्धिबळ परिचय या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाला.
गुगल मीट आणि फेसबुक लाइव्हवरून झालेल्या या कार्यक्रमात मुंबईच्या चॅलेंजर चेस अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष शरद वझे यांनी मार्गदर्शन केले. वझे हे पहिल्या जागतिक ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे टेबल डिरेक्टर तसेच 165 स्पर्धकांबरोबर सलग 12 तास बुद्धिबळ खेळून लिम्का बुकमध्ये नोंद करणारे प्रसिद्ध बुद्धिबळपटू आहेत.
नवीन पनवेल ब्राह्मण सभा या संस्थेच्या वतीने क्रीडाराधना समूहाची निर्मिती करण्यात आली असून या माध्यमातून विविध क्रीडाविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या समूहाच्या समन्वयक मंजुषा भावे, मुग्धा अंबेकर तसेच युवोन्मेष समूहाचे शार्दूल दामले, संकेत आराध्ये, देवेश पेंडसे आदी युवकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. राज्यभरातील बुद्धिबळप्रेमीनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply