महाड : प्रतिनिधी : किल्ले रायगड येथे अन्नसेवा देणारे आणि शिवसंग्रामचे रायगड जिल्हा चिटणीस अनंत देशमुख यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर देशमुख यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. शिवभक्त आणि गेली 50 वर्षे किल्ले रायगड पायथ्याला अन्नसेवा देणारे अनंत देशुमख यांची शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सुचविल्याप्रमाणे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या शासन नियुक्त सदस्यपदी नियुक्ती जाहीर केली आहे. पर्यटनाच्या माध्यमातून परिसराचा विकास करणे हेच आपले एकमेव ध्येय असून, महाड -मढेघाट-पुणे हा पर्यटन मार्ग म्हणून विकसित करणे, पाचाड शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करणे, किल्ले रायगडावर प्रशिक्षित गाईड उपलब्ध करणे, वीर स्थानकाचे महाड स्थानक असे नामांतर करून जलद ट्रेनना थांबा मिळवून देणे, अशी कामे करण्याचा मनोदय अनंत देशमुख यांनी व्यक्त केला.
Check Also
न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; कामांचा आढावा मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper