Breaking News

विराट आणि रोहित एकसारखेच

सर्वोत्तम कर्णधाराच्या प्रश्नावर चहलचे उत्तर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करीत आहे. बीसीसीआयने विराटवरील अतिक्रिकेटचा ताण कमी करण्यासाठी काही काळ रोहितकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं. रोहितच्या नेतृत्वाखालीही भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, मात्र या दोघांमध्ये सर्वोत्तम कर्णधार कोण यावर फिरकीपटू चहलने आपलं मत दिलं आहे.

माझ्या मते विराट आणि रोहित एकसारखेच आहेत. दोघेही आपल्या गोलंदाजांना मनासारखी गोलंदाजी करण्याची मुभा देतात. आम्हाला क्षेत्ररक्षणात जसे बदल हवे असतात तसे बदल केले जातात. त्यामुळे माझ्या दृष्टीने दोघांमध्ये फारसा फरक जाणवत नाही. विराट थोडासा आक्रमक आहे, रोहितकडे तो गुण नाही इतकाच काय तो फरक असेल. आपल्या गोलंदाजांना ते पूर्ण स्वातंत्र्य देतात. अस चहलने स्पष्ट केले. बांगलादेशविरुद्ध मालिकेत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं.या मालिकेत चहलने रोहितच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली होती. आता भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर तीन टी-20 आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply