कामोठे : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये द्वितीय इन्वेस्टीचर्स सेरेमनी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्कूलचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 12) झाला. या वेळी शाळेचे मंत्रिमंडळ स्थापन होऊन शपथविधीही झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महापालिकेचे शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, पीआरओ बाळासाहे कारंडे, शालेय कमिटी सदस्य आशा भगत, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, पर्यवेक्षिका रुहल दुबे, उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.
इन्वेस्टीचर्स सेरेमनीत विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आलेली जबाबदारी ते यशस्वीरीत्या पार पाडतील, असा विश्वास या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त करून कामोठ्यातील ही शाळा रयत शिक्षण संस्थेमधील एक नामवंत शाळा आहे, असे गौरोद्गार काढले, तर शाळेचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पालकांनी विद्यार्थ्यांसोबत कम्युनिकेशन करून त्यांच्या प्रगतीचे हिस्सेदार व्हायला पाहिजे, असे आवाहन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …