लंडन ः वृत्तसंस्था
वर्णभेदीच्या टिप्पणीवरून इंग्लंडकडून पदार्पणाच्या सामन्यातच ओली रॉबिन्सनवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर वर्णभेदावर टिप्पणीच्या जुन्या प्रकरणात अनेक क्रिकेटर्स अडकण्याची शक्यता आहे, मात्र इंग्लंड आणि वेल्स बोर्डाचा (इसीबी) चौकशीचा खेळ हास्यास्पद आहे, अशी टीका इंग्लंडचा माजी क्रिकेटर मायकल वॉन याने केली आहे. क्रिकेटर्सच्या जुन्या ट्विटची चौकशी करणे बंद करा, असेही त्याने बोर्डाला सुनावले आहे.
इंग्लंडचा मर्यादित षटकातील कर्णधार इयॉन मॉर्गन, यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर यांनी भारतीयांची थट्टा केल्यासंदर्भातील जुन्या ट्विटचा विषय सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला होता. या संदर्भात चौकशी सुरू आहे, असे ईसीबीने म्हटले होते. त्यावर खेळाडूंच्या जुन्या ट्विटची चौकशी करणे हास्यास्पद आहे, असा टोला वॉनने लगावला आहे.
वॉनने या संदर्भात ट्विट करताना लिहिलंय की, मॉर्गन, बटलर आणि अँडरसन यांनी ज्या वेळी ट्विट केले होते त्या वेळी त्यावर कोणीही आक्षेप घेतला नव्हता. काही वर्षांनंतर ते ट्विट आक्षेपार्ह कसे वाटते. इसीबीने तपासाचा सुरू केलेला खेळ बंद करावा.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …