चिंचोटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेंद्र तेलगे भाजपमध्ये दाखल

अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील चिंचोटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेंद्र तेलगे यांनी गुरुवारी (दि. 18) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा भाजपमधील प्रवेश शेकापला मोठा धक्का मानला जातो. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नरेंद्र तेलगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री रवीशेठ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, भाजप नेते दर्शन प्रभू आदी या वेळी उपस्थित होते. नरेंद्र तेलगे हे शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती बाळा तेलगे यांचे पुत्र आहेत.