Breaking News

समतेच्या क्रांतीभूमीत लोकशाहीचा जागर

महाडमध्ये पथनाट्यातून जनजागृती

महाड : रामप्रहर वृत्त

निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या कलाकारांनी समतेची क्रांतीभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाड येथे पथनाट्यातून मतदान विषयक जनजागृती केली. जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, महाड तहसीलदार चंद्रसेन पवार, माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे, पोलादपूर तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, महाड नायब तहसीलदार प्रदिप कुडळ यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी आणि शहरातील नागरिक या वेळी उपस्थित होते.

देशात सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा काळ असून, त्या पार्श्वभूमीवर महाड येथे ‘जागर लोकशाहीचा : मतदार जागृतीचा’ या शीर्षकाखाली लोकशाही तथा मतदान विषयक जनजागृतीपर पथनाट्य उपक्रम राबविण्यात आला. या पथनाट्याचे प्रयोग शहरातील चवदार तळे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर, बस स्थानक येथे करण्यात आले. पथनाट्यातून लोकशाहीचे स्वरूप व व्याप्ती समजावून देण्यासोबतच मतदानाचे स्वरूप व आवश्यकता, समानताधिष्ठित मतदान प्रक्रिया, दिव्यागांसाठी सोयीस्कर मतदान, इव्हिएम सोबत व्हीव्हीपॅट यंत्रणेचा उपयोग व फायदा आदी बाबीही समजावून सांगण्यात आल्या.

प्रिझम सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षता सोडेकर, नेहा तुपे, विशाखा चव्हाण, श्वेता खारकर, प्रांजली पाटील, वेदांत कंटक, प्रसाद अमृते, राज राणे, विराज पातरे या कलाकारांनी हे पथनाट्य सादर केले. प्रतिम सुतार लिखित या पथनाट्याचे दिग्दर्शन प्रतिक कोळी यांनी केले होते.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply