उरण : वार्ताहर 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तसेच शिवसेना, भाजप, आरपीआय व रासप महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 20) उरण तालुक्यात महायुतीच्या वतीने प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, दिनेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. हुतात्मा स्मारक, जासई येथून शनिवारी सकाळी 9 वाजता रॅलीला प्रारंभ होणार आहे. या रॅलीत नरेश रहाळकर, जितेंद्र घरत, संतोष ठाकूर, बी. एन. डाकी, रवि भोईर, गणेश शिंदे, कौशिक शहा, विनोद म्हात्रे, चंद्रकांत घरत, शेखर तांडेल, नितेश पाटील या महायुतीच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्ते सहभागी होतील.
