धाटाव : प्रतिनिधी
स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान तर्फे एक राखी देशासाठी या उपक्रम अंतर्गत दरवर्षी सीमेवरील सैनिकांना राख्या पाठविण्यात येतात. त्यासाठी राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अमित घाग, अध्यक्ष राजेश डाके, कार्याध्यक्ष राजेश भगत यांच्या पुढाकारातून सोमवारी (दि. 16) 100 राख्या स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानकडे सुपूर्द करण्यात आला.
सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष रोशन चाफेकर, हाजी कोठारी, व कार्यकर्ते तसेच फाउंडेशच्या श्रद्धा घाग, वैभव भगत, अमृता डाके, पुजा कुंडे, अश्विनी घाग, अदिती घाग, मेघना डाके, अंकिता वारंगे, स्वरा वारंगे, हर्षली घाग, प्रतीक्षा घाग या वेळी उपस्थित होत्या.