उरण : वार्ताहर
अतिवृष्टीमूळे कोकण किणारपट्टीवरील रायगड जिल्हातील महाड तालुक्यांतील सावित्री नदीला आलेल्या महापूरामूळे महाड शहर व आजुबाजूच्या गावांची मोठी वाताहत झाली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीचे भान ठेवून सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुल परिवाराच्या वतीने महाड शहरातील वेताळवाडी, तांबडभवन तसेच महाड शहरालगतच्या आजूबाजूच्या गावातील 180 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू, चादर, बेडशीट, साडी व टॉवेल देऊन मदतीचा हात दिला.
या वेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पालवे, उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख बी. डी. कसबे, कार्यालयीन अधीक्षक दत्ता शिंदे, सुरेश शिंदे, एस. पी. पाटील, नझिर शेख, एस. पी. सावंत, सामाजिक कार्यकर्ते अजय सुर्यवंशी, मनोज पाटील, एस. एन. मोरे, के. ए. पाटील, जे. एस. माळी, ओंकार नाईक, गजानन पाटील, बी. बी. महाजन, लिपिक प्रसाद सहस्रबुध्धे, रवींद्र देसले, एस. एस. किर्तने, उत्तम कुंभार, आर. बी. पिंजारी, विलास मुकादम, किरण मांगले, शशी पाटील, महादेव शिंदे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.