Breaking News

तळीयेच्या पुनर्वसनासाठी जागेची पाहणी

महाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर या गावाचे तत्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी पर्यायी जागा शोधण्याची कार्यवाही सुरू होती.

तळीये गावाजवळन एका 90 गुंठे पर्यायी जागेची प्रशासनाकडून शनिवारी (दि. 31) पाहणी करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, तहसीलदार दिलीप रायन्नावार, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता म्हात्रे, बांधकाम विभागाचे उपअभियंता देशमुख, तळीये गावचे सरपंच संपत तांडलेकर, उपसरपंच मस्के, इतर संबंधित अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

गावाच्या पुनर्वसनासाठी जी जागा पाहण्यात आली आहे, ती जागा तात्पुरत्या पुनर्वसनासाठी देण्यासाठी सुरेखा तुळशीराम म्हस्के या संबंधित जागा मालकिणीने त्यांची नाहरकत प्रशासनाला तत्काळ लेखी दिली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाणी, वीजपुरवठा होण्याबाबतची सुविधा उपलब्ध होईल किंवा कसे याबाबतचीही पाहणी पाणीपुरवठा व महावितरणच्या अधिकार्‍यांनी केलेली आहे. या जागेस त्यांच्याकडूनही संमती देण्यात आली आहे.

या कामाकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दिलीप रायन्नावार हे समन्वयकाची जबाबदारी पार पाडीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply